मुंबई क्रिकेट निवडणुकीत सचिनही मतदार 

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-01 01:29:10

img

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे.

लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 24 पुरुष आणि 15 महिला क्रिकेटपटूंना हा मान लाभला आहे. संजय मांजरेकर, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, अजित आगरकर, साईराज बहुतुले, संदीप पाटील, झहीर खान, विनोद कांबळी हे क्रिकेटपटू या नात्याने मतदार झाले आहेत. महिला क्रिकेटपटूत अंजली पेंढारकर, आरती वैद्य, अरुंधती घोष, दीपा मराठे, सुनेत्रा परांजपे आहेत. 

अर्थातच या निवडणुकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, आशिष शेलार, आदित्य ठाकरे, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, प्रताप सरनाईक, पंकज ठाकूर हे दिग्गजही मतदान करतील. 

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN