मॅचफिक्सिंगमुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-11-10 14:12:48

img

सकाळ वृत्तसेवा

बंगळुरू : मॅचफिक्सिंगमुळे क्रिकेट जगतात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये झालेल्या मॅच फिक्सिंगप्रकरणी काही खेळाडूंना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या तपास करणाऱ्या सेंट्रल क्राइम ब्रँचने अजून एक मोठी कारवाई केली आहे. 

कर्नाटक प्रीमियर लीगमधील मॅचफिक्सिंग प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला अटक करण्यात आली आहे. सय्यम असे या आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाचे नाव आहे. सय्यम हा हरियाणातील रहिवासी आहे. सट्टेबाजीच्या आरोपांमुळे त्याच्याविरोधात लूक-आऊट नोटीस काढण्यात आली आहे. 

कर्नाटक प्रीमिअर लीगमधील मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर निशांत सिंह शेखावत याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरूतील पथकाने अटक केली होती. भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याचे समोर आले होते.

दरम्यान बंगळुरू ब्लास्टर्स टीमचे बॉलिंग प्रशिक्षक विनू प्रसाद आणि बॅटिंग प्रशिक्षक विश्वनाथन यांना मागच्या वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक केला होती. सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 च्या मोसमात सहभागी होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN