मॅच फिक्सिंग, विराटच्या संघातील खेळाडूसह तिघांना अटक

Indian News

Indian News

Author 2019-11-07 13:00:00

img

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : बेंगळुरुत झालेल्या कर्नाटक प्रीमियर लीगला मॅच फिक्सिंग झाल्याचं समोर आलं होतं. आता या प्रकऱणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी मॅच फिक्सिंग प्रकरणात बेंगळुरू ब्लास्टर्सचा फलंदाज निशांत सिंग शेखावतला अटक केली होती. त्यानंतर आणखी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

सीबीआयच्या बेंगळुरूतील पथकाने आणखी दोन खेळाडूंना अटक केली आहे. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या या दोन्ही खेळाडूंवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. यामध्ये बेल्लारीचा कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांचा समावेश आहे. 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाल्याचं समोर आलं होतं.

सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. इतकंच काय तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 मध्ये होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला मुंबई आणि दिल्ली संघातही घेतलं होतं. तिथंही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. तर काझी याआधी कर्नाटककडून तर सध्या मिझोरामकडून खेळतो.

याआधीही काहींना याप्रकरणात अटक झाली आहे. बेंगळुरू ब्लास्टर्सचे बॅटिंग कोच वीनू प्रसाद, सेलिब्रिटी ड्रमर भावेश बाफना यांनाही ताब्यात घेतलं आहे. भावेश बाफनाने एका खेळाडूला एका षटकात 10 धावा देण्यासाठी आमिष दिलं होतं.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केलेला निशांत सिंग शेखावत संघातील सदस्य आणि बुकींच्या संपर्कात होता. निशांत विश्वनाथन आणि वीनू प्रसाद यांच्याशी बोलत असे. या मॅच फिक्सिंगमुळे केपीएलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने केपीएल 2009 मध्ये सुरू केली होती. आयपीएलच्या धर्तीवर कर्नाटकमधील खेळाडूंसाठी ही लीग सुरू करण्यात आली होती. केपीएलशिवाय तामिळनाडु प्रीमियर लीगमध्येही मॅच फिक्सिंग स्कँडल समोर आलं आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN