मोहम्मद शमी रिव्हर्स स्विंगचा बादशहा ठरु शकतो !

Loksatta

Loksatta

Author 2019-10-09 11:47:05

img

विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. ३ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात ५ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ५ पैकी ४ फलंदाजांना शमीने त्रिफळाचीत बाद केलं, त्याच्या या कामगिरीवर पाकिस्तानाच माजी गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच प्रभावित झाला आहे. आपल्या यू-ट्युब चॅनलवर बोलत असताना अख्तरने शमीचं कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – आश्विनमध्ये कसोटीत ५०० बळी घेण्याची क्षमता – हरभजन सिंह

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरीबद्दल बोलत असताना अख्तरने शमीला दिलेल्या सल्ल्याचा प्रसंग सांगितला. “इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकानंतर एक दिवस शमीने मला फोन केला होता. आपण संघासाठी फार चांगली कामगिरी करु शकलो नाही याची त्याला खंत होती. मी त्याला धीर न सोडता आपला फिटनेस राखण्याचा सल्ला दिला. घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेत तू चांगली कामगिरी करशील असंही मी त्याला म्हणालो. शमी चांगल्या पद्धतीने चेंडू वळवतो. याचसोबत त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग करण्याचीही क्षमता आहे. आशियाई खंडातील फार कमी गोलंदाजांकडे ही क्षमता असते. मी त्याला म्हणालो होतो की तू एकदिवस रिव्हर्स स्विंगचा बादशहा ठरु शकतोस.”

यानंतर आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने केलेली कामगिरी आपण सर्वच पाहत आहोत. जलदगती गोलंदाजांना फारशी मदत न मिळणाऱ्या खेळपट्टीवर शमीने ५ बळी घेतले. मी शमीने केलेल्या कामगिरीसाठी आनंदी आहे, अख्तरने शमीचं कौतुक केलं. दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्याती गहुंजे मैदानावर सुरु होणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD