यंदाही आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द

Mumbailive

Mumbailive

Author 2019-11-25 18:54:25

img

दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडणारा इंडियन प्रिमीअर लीगचा (आयपीएल) उद्घाटन सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींना बोलावून त्यांच्या नृत्याचं कार्यक्रम असलेल्या या सोहळ्यासाठी आयपीएलला अंदाजे ३० कोटी रुपये खर्च येतो. परंतु, हा खर्च अनावश्यक असल्याचं मत, गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत समोर आलं. या निर्णयावर एकमत झाल्यानं उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनावश्यक खर्च

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीदरम्यान 'उद्घाटन सोहळ्यावर होणारा खर्च हा अनावश्यक आहे. चाहत्यांना या सोहळ्यात तिळमात्र रस नसतो, पण यामध्ये प्रचंड पैसा वाया जातो', असं मत गव्हर्निंग काऊन्सिलमधल्या सदस्यानं माहिती दिली. आतापर्यंत झालेल्या उद्धाटन सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींसह हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे.

हेही वाचा - आयपीएलमध्ये कधीही खेळाडू बदलता येणार, नवीन नियम लवकरच लागू

४४ जवान शहीद

मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले अाहेत. त्यामुळं आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याकरिता येणारा सर्व खर्च पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे, असं बीसीसीआय प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा -

आयपीएलच्या १३ व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला लिलाव

२०१८-१९ या आर्थिक वर्षात रेल्वे बिघाडात 'इतकी' वाढ

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD