या 'बहाद्दरा'चे विराट टॅटू पाहून अनुष्काही लाजणार!

Pudhari

Pudhari

Author 2019-10-02 15:41:00

img

मुंबई: पुढारी ऑनलाईन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे फेव्हरिट कपल आहे. त्यामुळे ही जोडी विरुष्का या टोपण नावाने ओळखली जाते. क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील या दोन सेलेब्रिटींचा चाहतावर्ग फार मोठा आहे, पण एखाद्या चाहत्याने नुसतं विराट विराट केल, तर अनुष्का काय म्हणेल. हा प्रश्न त्या चाहत्याला पाहिल्यावर तुम्हालाही पडणारच.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होत आहे. सामन्यापूर्वी विराटला एक खास व्यक्ती भेटण्यासाठी आला होता. पिंटू बेहरा असे या व्यक्तीचे नाव असुन तो विराटचा जबरा फॅन आहे. विराटच्या या जबऱ्या फॅननं त्याला भेट दिल्यानंतर टी-शर्ट काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या चाहत्यानं टी-शर्ट काढल्यानंतर विराटही हैराण झाला.

img

img

कारण या चाहत्यांच्या अंगावर एक नव्हे तर तब्बल १५ टॅटू आहेत, अन् ते फक्त विराट कोहलीचे. ओडिशाच्या बरहामपूर येथे राहणारा बेहरानं आपल्या टॅटूबाबत सांगताना, “मी सर्वात आधी २०१६ मध्ये टॅटू केला काढला होता. त्यानंतर सलग १५ टॅटू गोंदवून घेतले. सगळ्यात आधी मी छातीवर विराटचा चेहरा गोंदवून घेतला होता. वर्ल्ड कप २०१९ मध्ये त्याने आणखी टॅटू गोंदवून घेतले”, असे सांगितले.

img

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN