या क्रिकेट मंडळाने बदलला सुपरओव्हरचा नियम !

Indian News

Indian News

Author 2019-09-24 17:14:05

img

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक २०१९ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मूळ सामना अनिर्णित राहिला आणि सुपर ओव्हर त्यावेळी खेळवण्यात आली. पण दोनही संघांची धावसंख्या सुपर ओव्हरमध्येही समानच राहिली आणि अखेर मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंड संघ विश्वविजेता बनला. आयसीसीच्या या नियमाबाबत त्यानंतर त्यांच्यावर खूप टीका करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत आता एक सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनवण्यात आला आहे.

मंगळवारी या नव्या नियमाबाबतची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली. दोन संघांमधील सामना जर अनिर्णित राहिला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.

पण जर ती सुपर ओव्हर अनिर्णित राहिली, तर एक संघ स्पष्ट विजेतेपद मिळवेपर्यंत सुपर ओव्हरचा खेळ सुरूच ठेवण्यात येईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. हा नियम पुरूष आणि महिला अशा दोनही बिग बॅश लीग स्पर्धांमध्ये लागू करण्यात येणार आहे. पण सुपर ओव्हर साखळी सामन्यात अनिर्णित राहिल्यास दोन संघांना गुण विभागून दिले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN