या नव्या शहरात खेळवले जाणार आयपीएल२०२० चे सामने.

Funny-videos-003

Funny-videos-003

Author 2019-11-10 20:11:09

img

आयपीएल 2020चा हंगाम (IPL 2020 Season) जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (IPL13th Season) असणार आहे. मंगळवारी (12 नोव्हेंबर) बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आयपीएलच्या आठ फ्रेंचायझी संघाच्या मालकांना भेटणार आहेत.

ही भेट मुंबईत (Mumbai) होईल. या भेटीत तीन नवीन शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो.

या आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश होणार नाही. परंतु, नवीन शहरांचा समावेश असणार आहे.

"लखनऊ (Lucknow), गुवाहाटी (Guwahati) आणि तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) या तीन शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यासाठी चर्चा होऊ शकते.

किंग्स इलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) लखनऊला आपले दुसरे घरचे मैदान बनवायचे आहे."

"राजस्थान राॅयल्सचा (Rajasthan Royals ) संघ अहमदाबाद (Ahmedabad) ऐवजी गुवाहाटीमध्ये आपले घरचे सामने खेळू इच्छित आहे," असे आयएनएसशी बोलताना बीसीसीआयचे अधिकारी असे म्हणाले.

"या तीन शहरांमधील तिरुवनंतपुरम हे शहर कोणत्या संघाचे घरचे मैदान असेल याबद्दल विचार झालेला नाही. राजस्थानच्या संघाने त्यांचे दुसरे घरचे मैदान अहमदाबादच्या ऐवजी गुवाहाटीमध्ये हलवण्याची मागणी केली आहे. जनरल कमिटीने या विचारावर सहमती दिली तर बारसापरा क्रिकेट स्टेडियमचे (Barsapara Cricket Stadium) निरीक्षण केले जाऊ शकते," यावेळी बीसीसीआयचे अधिकारी असेही म्हणाले.

"किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आयपीएलच्या मागील हंगामापासूनच लखनऊमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी यासंदर्भात आमच्याशी यापूर्वीच विनंती केली होती. परंतु, सामने हलवण्यासाठी खूप वेळ लागणार होता. त्यावर निवडणूक घेणे महत्त्वाचे आहे," असे बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले.

"अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये (Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात सामना खेळण्यात आला होता. त्यामध्ये या मैदानाचा रिव्ह्यू ऐकूण छान वाटले.'

'आता क्रिकेटचे हे ठिकाण पंजाबचे दुसरे घरचे मैदान होण्यासाठी जवळपास तयार झाले आहे. यापूर्वी या संघ मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियम (IS Bindra Stadium) आणि इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये (Holkar Stadium) घरचे सामने खेळले आहेत," असेही बीसीसीआयचे अधिकारी यावेळी म्हणाले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN