या मोठ्या कारणामुळे एमएस धोनी टीम इंडियापासून दूर.

Indian News

Indian News

Author 2019-09-27 14:46:10

img

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी 2019 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तो भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. आता त्याने ही विश्रांती नोव्हेंबरपर्यंत वाढवली असल्याचीही चर्चा आहे.

त्याच्या या विश्रांतीमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पण धोनीने त्याच्या काही दुखापतींमुळे ही विश्रांती घेतली असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या सुत्रांनी माहिती दिली की, धोनी विश्वचषकसाठी पाठीची दुखापत असताना गेला होता. ही दुखापत स्पर्धा सुरु असताना वाढली.

तसेच विश्वचषकादरम्यान धोनीला मनगटाचीही दुखापत झाली होती. त्यामुळे या दुखापतींमुळे धोनीने क्रिकेटपासून दूर राहणे पसंत केल्याची शक्यता आहे.

धोनीने आता नोव्हेंबरपर्यंत विश्रांती घेतली असल्याने तो आता थेट डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.

Related Posts

या महिन्यात होणार आयपीएल २०२०चा लिलाव

Sep 26, 2019

क्रिस्तियानो रोनाल्डो की लियोेनेल मेस्सी? विराट कोहलीने.

Sep 26, 2019

-या महिन्यात होणार आयपीएल २०२०चा लिलाव

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD