युवराजने शेअर केला न्यू लूक, सानिया मिर्झानं घेतली फिरकी

News18

News18

Author 2019-09-29 14:58:00

img

मुंबई, 29 सप्टेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सध्या सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. त्यानं इन्स्टाग्रामवरून नव्या लूकचा फोटो शेअर केला होता. काही दिवसांपूर्वी दाढी असलेला फोटो पोस्ट केल्यानंतर आता वेगळाच फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर सानिया मिर्झाने कमेंट करत सल्ला दिला आहे.

युवराजने त्याचा क्लीन शेव केलेला फोटो शेअर केला आहे. यात त्यानं चष्मा घातला असून पाउट करताना दिसत आहे. त्यानं कॅप्शन देताना म्हटलं की, न्यू लूक, चिकना चमेला, मी पुन्हा दाढी ठेवायला पाहिजे का? असा प्रश्नही त्यानं विचारला आहे. युवराजच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. जुना युवराज परत आला असंही काही चाहत्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने युवराजची या लूकवरून फिरकी घेतली आहे. सानियाने कमेंट करताना म्हटलं आहे की, वाढलेले गाल लपवण्यासाठी पाउट केला आहे का? दाढीवाल्या लूकमध्येच परत ये अशी कमेंट सानियानं केली आहे.

img

सानिया तिच्या फिटनेसबाबत जागरूक आहे. सानियाने काही दिवसांपूर्वी तिच्या वर्कआऊटचा व्हिडिओ शेअऱ केला होता. प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं वजन तिनं कमी केलं आहे.

युवराज सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर युवराज कॅनडातील टी20 लीगमध्येही खेळला. भारताला 2011 चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्यानं महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD