युवराज म्हणतो, तर मी अजून एक विश्वचषक खेळलो असतो!

Indian News

Indian News

Author 2019-09-27 22:03:55

img

काही महिन्यांपूर्वी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच बीसीसीआच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर आता युवराजने खूलासा केला आहे की त्याला आणखी एक विश्वचषक खेळायचा होता.

2011 विश्वचषकाचा मालिकावीर युवराज आजतकशी बोलताना म्हणाला, 'मला वाईट वाटते की 2011 नंतर मी आणखी एक विश्वचषक खेळू शकलो नाही. त्यानंतर मला संघ व्यवस्थापनाकडून आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. जर त्यावेळी मला पाठिंबा मिळाला असता तर कदाचित मी अजून एक विश्वचषक खेळू शकलो असतो.'

'पण मी जे काही क्रिकेट खेळले, माझ्या स्वत:च्या हिंमतीवर खेळले.

मला कोणी गॉडफादर नव्हता.'

त्याचबरोबर युवराजने योयो टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

'मला वाटले नव्हते 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मी खेळलेल्या 8-9 सामन्यांपैकी मला दोनदा सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतरही संघातून वगळले जाईल. मी दुखापतग्रस्त झालो होतो आणि मला श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करायला सांगण्यात आले होते.'

'अचानक मला परत जाऊन वयाच्या 36 व्या वर्षी यो-यो टेस्टसाठी तयारी करावी लागली. मी यो-यो टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतरही मला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले. त्यांना वाटले मी माझ्या वयामुळे उत्तीर्ण होणार नाही आणि त्यामुळे मला नकार देणे सोपे जाईल.'

Related Posts

२३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या.

Sep 27, 2019

सौरव गांगुली पुन्हा एकदा सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी

Sep 27, 2019

'मला वाटते हे दुर्दैवी आहे कारण जो खेळाडू 15-16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला असतो त्याला तूम्ही समोर बसून सांगायची गरज असते. कोणीही मला सांगितले नाही. कोणी विरेंद्र सेहवागला किंवा झहिर खानला सांगितले नाही.'

पण असे असले तरी युवराजने कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगितले आहे. तसेच योग्यवेळी निवृत्ती घेतली असल्याचे म्हटले आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN