युवा शुभमन गिलने मोडला विराटचा विक्रम

Loksatta

Loksatta

Author 2019-11-04 18:48:59

img

देवधर चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत ब आणि भारत क या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला. या सामन्याच्या माध्यमातून देवधर चषक स्पर्धेला इतिहासातील सर्वात तरूण कर्णधार मिळाला. या सामन्यात खेळताना भारत क संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे होते. देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधारपद भुषवणाऱ्या तरूण कर्णधारांच्या यादीत शुभमनने विराटला मागे टाकले.

शुभमन अंतिम फेरीसाठी मैदानावर उतरला तेव्हा त्याचे वय २० वर्षे आणि ५७ दिवस इतके होते. तर २००९ – १० साली विराट जेव्हा अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी उतरला होता, तेव्हा त्याचे वय २१ वर्षे आणि १२४ दिवस एवढे होते. या यादीत तिसऱ्या स्थानी उन्मुक्त चंद (२२), चौथ्या स्थानी श्रेयस अय्यर (२३ वर्षे ९२ दिवस), पाचव्या स्थानी मनोज तिवारी (२३ वर्षे १२४ दिवस) तर सहाव्या स्थाना महान क्रिकेटपटू कपिल देव (२३ वर्षे ३०५ दिवस) यांचा समावेश आहे.

दरम्यान, भारत ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून यशस्वी जैस्वालने ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर अनुभवी केदार जाधवने धमाकेदार खेळी केली. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचत ८६ धावांची खेळी केली. विजय शंकरने ४५ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. तर शेवटच्या टप्प्यात कृष्णप्पा गौतमने १० चेंडूत ३५ धावा ठोकल्या. या साऱ्यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारत ब संघाने ७ बाद २८३ धावांपर्यंत मजल मारली. इशान पोरेलने त्यांचा अर्धा संघ माघारी धाडला. या आव्हानाचा पाठलाग करणे भारत क संघाला शक्य झाले नाही. त्यामुळे भारत ब संघाने देवधर चषक ५१ धावांनी जिंकला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN