रवी शास्रींचे प्रशिक्षकपद का आहे धोक्यात ?

Indian News

Indian News

Author 2019-09-29 23:31:55

img

क्रिकेट विश्वचषकानंतर भारताने रवी शास्री यांची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती. या निवडीबाबत बीसीसीआयने आक्षेप घेतले आहेत. तसेच ही निवड परस्पर हितसंबंध जपत केल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. निवड समितीमधील कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयने नोटीस पाठवली असून या नोटिशीला १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.

त्यातच रंगास्वामी यांनी बीसीसीआयची नोटीस येताच पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी रंगास्वामी यांनी असे म्हटले की, ''माझ्याकडे बरेच काम आहे. तसेच समितीची बैठक वर्षातून फार तर दोन ते तीन वेळा होते. त्यामुळे हितसंबंध कसे जपले जातील?'' तर जर क्रिकेट सल्लागार समितीतल्या सदस्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत तर शास्री यांचे पद धोक्यात आहे, असे जाणकार सांगत आहेत.

(हेही वाचा पंत आणि धोनीबद्दल सुरेश रैनाचे 'बोल')

भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनादेखील बीसीसीआयने नोटीस पाठवली आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेतच रवी शास्री यांची फेरनिवड करण्यात आली होती. या समितीमध्ये देव यांच्यासह अंशुमन आणि रंगस्वामी हेदेखील होते. बीसीसीआयमध्ये एक व्यक्ती एका वेळेस एकच पद भूषवू शकते. कपिल देव बीसीसीआयशी समालोचक म्हणून करारबद्ध आहेत.

एकापेक्षा जास्त पदं भूषवल्याने परस्पर हितसंबंध जपल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. विश्वचषक झाल्यावर संघाच्या प्रशिक्षकांच्या निवडीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीचे अध्यक्षपद कपिल देव यांच्याकडे होते. या समितीने रवी शास्री यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड करण्यात आली. या सर्व बाबी लक्षात घेत मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी परस्पर संबंध जपले जात असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच बीसीसीआयने या खेळाडूंना नोटीस देत कारणे विचारली आहेत.

- BCCI Send notice to Kapil and other members

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD