राग वाईटच! या खेळाडूचे रागाच्या भरात झाले मोठे नुकसान.

Indian News

Indian News

Author 2019-10-14 22:49:47

img

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शला शेफिल्ड शिल्ड 2019 स्पर्धेत तास्मानिया विरुद्ध खेळताना उजव्या हाताला दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे ही दुखापत तो बाद झाल्यानंतर निराश होऊन त्यानेच भिंतीवर हात मारल्याने झाली आहे.

झाले असे की 10 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या तास्मानिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघातील या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा मिशेल मार्श दुसऱ्या डावात 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर त्याने ड्रेसिंगरुममध्ये भिंतीवर राग व्यक्त करताना हात मारला. त्यामुळे त्याला हाताला फ्रॅक्चर झाल्याची शक्यता आहे.

त्याच्या या दुखापतीबद्दल वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की 'त्याच्या या दुखापतीची तपासणी झाल्यानंतर दुखापतीती व्याप्ती आणि त्याच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल निश्चित माहिती मिळेल.'

मिशेल मार्श शुक्रवारपासून वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया विरुद्ध सुरु होणाऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN