राहुल हुलमनीची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-01 02:48:00

img

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव :

बेळगावच्या आरएलएस महाविद्यालयाचा राहुल संगमेश्वर हुलमनी याची राष्ट्रीय पदवीपूर्व आंतरमहाविद्यालयीन टेबलटेनीस स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य पदवीपूर्व आंतरमहाविद्यालयीन टेबलटेनीस संघात निवड झाली आहे.

राहुल हुलमनी याने बिदर येथे झालेल्या कर्नाटक राज्य पदवीपूर्व आंतरमहाविद्यालयीन टेबलटेनीस स्पर्धेत विशेष कामगिरी करताना अस्मरणीय यश संपादन केले. गुजरात येथील बडोदा येथे होणाऱया राष्ट्रीय पदवीपूर्व आंतरमहाविद्यालयीन टेबलटेनीस स्पर्धेत राहुल हुलमनी खेळणार आहे.

केएलई संस्थेंचे सदस्य आणि आमदार महांतेश कवटगीमठ, प्राचार्य निजनाप्पानवर व प्राध्यापक यांनी राहुल हुलमनीचे विशेष कौतुक केले आहे. राहुल हुलमनी हा ऍड. संगमेश्वर हुलमनी व संजीवनी हुलमनी यांचा चिरंजीव असून क्रिडा प्रा. रिचा राव यांचे प्रोत्साहन लाभत आहे. टेबलटेनीस प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN