रोमांचक सामन्यात विंडीजची बाजी

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-03 05:10:00

img

भारतीय महिला संघ अवघ्या एका धावेने पराभूत, प्रिया पुनियाची खेळी व्यर्थ

वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड (वेस्ट इंडिज)

शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाला एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करत विंडीजने भारतीय महिलांना विजयासाठी 226 धावांचे आव्हान दिले होते. यानंतर, विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला 224 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 3 रोजी होईल.

प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना विंडीजची खराब सुरुवात झाली. सलामीवीर स्टे किंग (12) व शेमिन कॅम्पबेल (0) स्वस्तात तंबूत परतल्या. यानंतर, नताना मॅक्लेनच अर्धशतक आणि कर्णधार स्टेफानी टेलरच्या यांनी शानदार खेळ साकारत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मॅक्लेनने 82 चेंडूत 51 धावा फटकावल्या. कर्णधार टेलरने 91 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 94 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत विंडीजच्या चेडन नेशननेही 43 धावा फटकावल्यामुळे विंडीजला निर्धारित 50 षटकांत 7 बाद 225 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून शिखा पांडे आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी 2 बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी पहिल्या गडय़ासाठी 78 धावांची भागीदारी केली. प्रिया पुनियाने 75 तर जेमिमाने 41 धावा फटकावल्या. यानंतर पुनम राऊतने 22 तर मितालीने 20 धावा केल्या. मात्र या दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. मोक्मयाच्या क्षणी विकेट फेकल्यामुळे भारतीय महिला संघाचा डाव 224 धावांवर आटोपला. विंडीजकडून अनिसा मोहम्मदने 5 तर स्टेफानी टेलर, शबिका यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक : विंडीज महिला संघ 50 षटकांत 7 बाद 225 (मॅक्लेन 51, स्टेफानी टेलर 94, नेशन 43, शिखा पांडे 2/38, दीप्ती शर्मा 2/41, पूनम यादव 1/36, झुलन 1/46).

भारतीय महिला संघ 50 षटकांत सर्वबाद 224 (प्रिया पुनिया 75, जेमिमा रॉड्रिग्ज 41, पुनम राऊत 22, मिताली राज 20, दीप्ती शर्मा 19, अनिसा मोहम्मद 5/46, गजनबी 2/25).

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD