रोहितचे शानदार शतक

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-03 03:06:00

img

विशाखापट्टणम । विशाखापट्टणमच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात येणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याला पावसाचा फटका बसला असून भारतीय फलंदाजांनी चहापानाच्या सत्रापर्यंत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. भारताने पहिल्या दिवसाअखेरीस सलामीवीर रोहित शर्माचे नाबाद शतक आणि मयांक अग—वालने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर बिनबाद 202 धावांपर्यंत मजल मारली आहे. खेळ चहापानाआधी अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला. यानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचांनी उरलेल्या दिवसाचा खेळ रद्द केला. दिवसाअखेरीस रोहित शर्मा नाबाद 115 तर मयांक अग्रवाल नाबाद 84 धावांवर खेळत होता.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतला. सराव सामन्यात रोहित शून्यावर बाद झाल्यामुळे आफ्रिकेच्या गोलंदाजांचा रोहित कसा सामना करतो हे सर्वांना पहायचे होते. पण रोहितने संयमाने फलंदाजी करत खेळपट्टीवर स्थिर होण्याला वेळ दिला. यानंतर जम बसल्यानंतर रोहितने आपल्या ठेवणीतले फटके खेळले. दुसर्‍या बाजूने मयांक अग—वालनेही त्याला चांगली साथ दिली. आफ्रिकेच्या गोलंदाजांचे भारताची जोडी फोडण्याचे प्रयत्न अपूरे पडल्यामुळे दुसर्‍या दिवशी आफ्रिकेचे गोलंदाज भारताची जोडी फोडण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिर होण्यासाठी थोडा वेळ घातला. मात्र मैदानात जम बसल्यानंतर मयांक आणि रोहितने चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. आफ्रिकन कर्णधाराने भारताची ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशीच ठरला. रोहित-मयांक जोडीने पहिल्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची भागीदारी केली.

दोन वर्षांनंतर शतकी खेळी
रोहितच्या टेस्ट करिअरवर एक नजर टाकल्यास हे लक्षात येतं की त्याने 2013 साली वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला टेस्टमधील आपलं स्थान पक्कं करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. या सामन्यात त्याला प्रथमच सलामीला येण्याची संधी मिळाली. त्याने 154 चेंडूत शतक झळकावत आपल्या कसोटीतील पहिल्या स्थानाबाबत संघ व्यवस्थापन आपल्यावर विश्वास ठेवू शकतं हे दाखवून दिलं. वनडे इंटरनॅशनल आणि टी-20 इंटरनॅशनलमध्ये धावांचा पाऊस पाडणार्‍या रोहितला कसोटीत मात्र दोन वर्षांनंतर शतक ठोकण्याची संधी मिळाली. यापूर्वी त्याने नोव्हेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात झालेल्या कसोटी सामन्यात नाबाद 102 धावा कुटल्या होत्या.

कसोटी करिअरचे चौथं शतक – 29 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत रोहितने आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. डावाच्या 54 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सेनुरनच्या बॉलवर एक धाव घेत त्याने विजयी शतकी सलामी दिली. हे त्याच्या कसोटी करिअरचं चौथं शतक आहे तर कसोटीत सलामीला आल्यानंतरचं पहिलं शतक आहे.

चौकाराने उघडले खाते
रोहित शर्मा वनडे इंटरनॅशनल आणि टी-20 सामन्यांमध्ये ओपनिंग करतो; पण कसोटी सामन्यात सलामीला येण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. पण याचं कुठलंही प्रेशर न घेता त्याने आपल्या नेहमीच्या दिमाखात खेळाची सुरुवात केली. त्याने दुसर्‍या षटकाच्या दुसर्‍या बॉलवर कागिसो रबाडाला बॅकवर्ड पॉइंटवर षटकार लगावत आपलं खातं उघडलं. सामन्यात रोहितचा हा दुसराच चेंडू होता.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून एकत्र खेळणार्‍या जोडीने शतक झळकावणारी ही तिसरी भारतीय जोडी ठरली आहे. याआधी 2005-06 साली विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडने पाकिस्तानविरुद्ध आणि मुरली विजय-शिखर धवन जोडीने 2012-13 हंगामात ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतकी भागीदारी केली होती. पहिल्या दिवसाचं एक सत्र पावसामुळे वाया गेलं असल्यामुळे दुसर्‍या दिवशी भारतीय फलंदाज कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN