रोहित जे करू शकतो ते विराटही करु शकत नाही - सेहवाग

Indian News

Indian News

Author 2019-11-09 15:43:53

img

गुरूवारी (7 नोव्हेंबर) राजकोट (Rajkot) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा आंतरराष्ट्रीय टी20 सामना (2nd T20 Match) पार पडला. या सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला.

भारताच्या या विजयात प्रभारी कर्णधार रोहित शर्माने 43 चेंडूत सर्वाधिक 85 धावांची खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याची ही खेळी पाहून सामना झाल्यानंतर भारताचा विस्फोटक माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) रोहित शर्मा (Rohit Sharma) जे करु शकतो ते विराट कोहलीही(Virat Kohli) करु शकत नाही, असे म्हटले आहे.

भारतासाठी जे काम सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) करत होता, ते काम आता रोहित शर्मा करत आहे.

त्याने निडर होऊन खेळणे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरते" असे क्रिकबझ वेबसाईटवर रोहितच्या खेळीचे विश्लेषण करताना सेहवाग म्हणाला.

"रोहित जे काम करू शकतो ते कदाचित विराट कोहलीपण नाही करू शकत. एका षटकात तीन-चार षटकार मारण्याची कला रोहितकडे आहे. तसेच, 45 चेंडूत 90-100 धावा करण्याबद्दल तो अगदी सहजतेने बोलताना पाहायला मिळतो," असे रोहितच्या आक्रमक खेळाबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला.

"मी कोहलीला इतके आक्रमक खेळताना पाहिले नाही," असेही सेहवाग म्हणाला.

त्याचबरोबर सेहवाग आणि अजय जडेजाने भारतीय संघाच्या कमकुवत बाजूंवरही चर्चा केली. भारतीय संघ अजूनही विराट आणि रोहितवर अवलंबून आहे. मधल्या फळीतील खेळाडू भारतीय संघाला विश्वास देऊ शकले नाहीत.

त्याचबरोबर सेहवागने शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) खराब प्रदर्शनावर चर्चा केली. "भारतीय संघातील सलामी जोडीची खेळी बदललेली दिसत आहे. भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून पहिल्या 10 षटकात जे काम पूर्वी धवन करत होता ते आता रोहित करत आहे. धवनला यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सुरुवातीला धवन विस्फोटक खेळत होता आणि रोहित सावकाश खेळत सामन्याची परिस्थिती सांभाळत होता," असे सेहवाग म्हणाला.

राजकोटमधील टी२० सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे. यानंतर रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूरमध्ये टी20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना पार पडणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD