रोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम

Indian News

Indian News

Author 2019-10-05 22:01:51

img

सलामीवीर म्हणून कसोटी सामन्यांच्या दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने षटकार आणि शतकांचा नवा विक्रम रचला आहे. त्याच्या या खेळीने अनेक खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने हे विक्रम रचले आहेत.

रोहितने पहिल्या डावात १७६ धावा काढल्या, तर दुसऱ्या डावात १२७ धावा काढल्या आहेत. केशव महाराजाने बळी घेत त्याच्या या अफलातून खेळीला पूर्णविराम दिला आहे. पहिल्या डावात २४४ चेंडूत २३ चौकार व सहा षटकार मारत रोहितने १७६ धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात १४९ चेंडूंत १० चौकार व ७ षटकार लगावत १२७ धावा केल्या.

( हेही वाचा -'अश्विनला एकाकी पाडणे अत्याचारच' - सुनील गावस्कर)

एकाच कसोटी सामन्यात तब्बल नऊ षटकार लगावणारा रोहित हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या या खेळीने नवज्योत सिंग सिद्धूचा १९९४ सालचा आठ षटकारांचा विक्रम मोडीत निघाला. त्याने दोन्ही डावांत मिळून १३ षटकार ठोकले आहेत. हा पराक्रम करणारा तो जगभरातील एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९९६ मध्ये पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रमने झिम्बाब्वे विरुद्ध १२ षटकार ठोकले होते.

Rohit Sharma Makes world record in test cricket

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN