रोहित शेट्टीने घेतली नवी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Indian News

Indian News

Author 2019-11-08 20:24:58

img

खरेदी करताय? तत्पूर्वी खालील 'Search Box' मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!

खरेदी करताय? तत्पूर्वी वरील 'Search Box' मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!

महाराष्ट्र विश्व न्यूज, (ब्युरो रिपोर्ट) - हवेत गाड्या उडणारे सीन किंवा अभिनेत्याच्या गाडीची होणारी जोरदार टक्कर हे दृश्य असणारा चित्रपट म्हणजे रोहित शेट्टीचा चित्रपट असे सर्रास ऐकायला मिळते.

दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलिवूडमध्ये अॅक्शन सीन्ससाठी लोकप्रिय आहे. चित्रपटांमध्ये गाड्यांचे खास अॅक्शन सीन दाखवणारा रोहित शेट्टी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही गाड्यांचा वेडा असल्याचे पहायला मिळते. नुकताच रोहितने त्याच्या गाड्यांमध्ये आणखी एका गाडीचा समावेश केला आहे.

न्यायालय, शिक्षण, पोलीस, बेकायदा सावकारी ई.बाबत कायदेतज्ञांकडून जाणून घ्या तुमचे शेकडो कायदेशीर अधिकार, सर्व लेख एकत्रित वाचण्यासाठी क्लिक करा!

रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीसोबतचा एक फोटो शेअर केला. ही पिवळ्या रंगाची Lamborghini Urus आहे. रोहितने ही नवी लक्झरी कार स्वत:साठी विकत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. या Lamborghini Urus ची किंमत तब्बल ३ कोटी रुपये आहे. भारतातील काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे ही कार आहे. आता या Lamborghini Urus असणाऱ्या भारतीयांमध्ये रोहित शेट्टीचा समावेश झाला आहे.

रोहित शेट्टीकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यामध्ये फोर्ड, रेंज रोवर अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. आता या गाड्यांमध्ये Lamborghini Urus चा समावेश झाला. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीला चित्रपटात वापरण्यात आलेल्या गाड्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर रोहित शेट्टीने 'आम्ही चित्रपटातील स्टंटमध्ये वापरत असलेल्या सगळ्या गाड्या आमच्याकडेच ठेवतो. पण कधीकधी स्टंट दरम्यान गाड्यांमध्ये बिघाड होते. तेव्हा आम्ही काहीच करु शकत नाही. पण आम्ही त्या गाड्यांचा पुढच्या चित्रपटामध्ये वापरतो. अन्यथा सर्व गाड्या माझ्या घराच्या बेसमेंटमध्ये असतात. कधीकधी मी फिरण्यासाठी त्या बाहेर काढतो' असे रोहीत शेट्टी म्हणला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN