लंकन संघाचे पाकला प्रयाण

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-25 05:12:00

img

वृत्तसंस्था/ कोलंबो

लंकेच्या क्रिकेट संघाने  मंगळवारी पाकच्या दौऱयासाठी प्रयाण केले. या दौऱयात उभय संघामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. पाकमधील सुरक्षा व्यवस्था चोख राहील असा विश्वास बाळगत लंकन संघाने या दौऱयासाठी प्रयाण केले आहे.

2009 साली लाहोरमध्ये लंकन क्रिकेट संघावर दहशदवादी हल्ला झाला होता. या घटनेनंतर पाकमध्ये कोणताही विदेशी संघ मालिका खेळण्यास इच्छूक झाला नाही. पाकविरूद्ध होणाऱया टी-20 मालिकेसाठी लंकेचे नेतृत्व डी. शेनका यांच्याकडे देण्यात आले आहे. वनडे सामने कराचीत तर टी-20 सामने लाहोरमध्ये खेळविले जातील. 27 सप्टेंबरला कराचीत पहिल्या वनडे सामन्याने लंकेच्या पाक दौऱयाला प्रारंभ होईल.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD