लंकेला विजयासाठी 306 धावांचे लक्ष्य

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-01 02:52:00

img

बाबर आझमचे शानदार शतक, फखर झामनचेही अर्धशतक

वृत्तसंस्था/ कराची

बाबर आझम (105 चेंडूत 115) व फखर झामन (54) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने लंकेविरुद्ध दुसऱया वनडे सामन्यात 50 षटकांत 7 बाद 305 धावा केल्या. इमाम उल हक (31), हॅरिस सोहेल (40) धावांचे योगदान दिले खरे पण इतर पाक फलंदाजांना अपेक्षित कामगिरी साकारता आली नाही.

प्रारंभी, पाक कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फखर झामन व इमाम अल हक यांनी 73 धावांची सलामी दिली. इमामला 31 धावांवर डी सिल्वाने बाद करत ही जोडी फोडली. फखर झामनने अर्धशतकी खेळी साकारताना 65 चेंडूत 54 धावा फटकावल्या. सलामीची ही जोडी बाद झाल्यानंतर बाबर आझम व हॅरिस सोहेल यांनी तिसऱया गडय़ासाठी 111 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. आझमने शतकी खेळी साकारताना 105 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारासह 115 धावांचे योगदान दिले. सोहेलने 48 चेंडूत 40 धावा करत त्याला चांगली साथ दिली. आझमच्या या शतकी खेळीमुळे पाकला निर्धारित 50 षटकांत 7 बाद 305 धावांचा डोंगर उभा करता आला. इफ्तिकार अहमद 32 धावावर नाबाद राहिला. लंकेकडून वहिंदू हसारेंगाने 2 तर उदाना, लहिरु कुमाराने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 50 षटकांत 7 बाद 305 (फखर झामन 54, बाबर आझम 115, हॅरिस सोहेल 40, अहमद नाबाद 32, हसारेंगा 2/63, उदाना 1/60)

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN