वर्ल्डकप जिंकून देणारा तो निर्णय बदलला

Jagruk News

Jagruk News

Author 2019-10-15 00:56:42

क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याला देवासारखे पुजले जाते. हा खेळ जेवढा लोकांना आवडतो तेवढाच वाद सुद्धा ह्या खेळामुळे होत असतो. नेहमी ह्या खेळातील नियमांमुळे वाद निर्माण होताना तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल. २०१९ च्या ह्या विश्वकप मध्ये बरेच असे नियम खेळाच्या मध्ये आले ज्याने जिंकणारा संघ पराभूत झाला आणि ह्या नियमांमुळे समोरच्या संघाला त्याचा फायदा झाला. तुम्हाला वर्ल्डकप मधील अंतिम सामना तर आठवत असेलच. अत्यंत नाट्यमय हा सामना रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ह्यात अनेक नियम असे होते ज्यामुळे न्यूझीलंड संघ अंतिम सामना जिंकू शकला नाही.

imgSource Google

न्यूझीलंड आणि इंग्लंड ह्यांच्यात झालेल्या अंतिम सामना हा टाय झाला. त्यामुळे ह्या दोन्ही संघात सुपर ओव्हर खेळवण्यात आला होता आणि फिल्मी पद्धतीने हा सुपर ओव्हर सुद्धा टाय झाला. नंतर इंग्लंड संघाला चौकार षटकार ह्यांच्या जोरावर विजयी म्हणून घोषित करण्यात आले. ह्या निर्णयामुळे बरीच टीका संपूर्ण जगभरातून झाली. अनेक मोठ्या दिग्गज खेळाडूंनी ह्या निर्णयावर आक्षेप दर्शवला.एवढेच काय तर दिग्गज पंचांनी सुद्धा ह्या गोष्टीवर आवाज उठवला.

imgIndia Today

हे सर्व होत असताना आयसीसीने मोठ्या नियमाची घोषणा आज केली आहे. ज्या कारणामुळे वर्ल्डकपच्या सामन्यात न्यूझीलंड संघ पराभूत झाला तो नियम बदलण्यात आला आहे. मोठ्या सामन्यामध्ये जर एखादा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जो पर्यंत सामन्याचा निकाल हाती येत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल असे आयसीसीने जाहीर केलं आहे.

अशाच प्रकारच्या क्रीडक्षेत्रातील बातम्यांसाठी आपले जे जागरूक न्यूज पेज फॉलो करा कारण आपण रोज पाच खेळासंदर्भाच्या न्यूज पोस्ट करत असतो.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN