विंडीज दौऱयासाठी महिला संघाची घोषणा

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-28 05:11:00

नोव्हेंबरमध्ये होणार 3 वनडे, 5 टी-20 सामन्यांची मालिका

वृत्तसंस्था/ मुंबई

विंडीज दौऱयासाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय महिला संघाची घोषणा केली असून या दौऱयात भारतीय महिला तीन वनडे व पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

यातील सामने सेंट लुसिया व गयाना येथे खेळविले जाणार आहेत. भारताचा हा दौरा 1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिका महिला संघ भारत दौऱयावर असून पाच टी-20 व तीन वनडे सामने खेळविले जात आहेत. त्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिलांनी 11 धावांनी विजय मिळविला तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. गेल्या महिन्यात टी-20 प्रकारातून निवृत्ती घेतलेली मिताली राज वनडे विंडीजमधील मालिकेत संघाचे नेतृत्व करेल तर हरमनप्रीत कौर टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व केले.

विंडीज दौऱयासाठी जाहीर करण्यात आलेले संघ : वनडे : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, डी. हेमलता, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम यादव, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), प्रिया पुनिया, सुषमा वर्मा.

टी-20 संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN