विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबईने विजयाचे खाते उघडले

Loksatta

Loksatta

Author 2019-10-02 10:08:01

img

बेंगळूरु : पावसामुळे वाया गेलेले सुरुवातीचे दोन सामने आणि छत्तीसगढविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या धक्कादायक पराभवानंतर मंगळवारी अखेरीस मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी साकारलेल्या दमदार अर्धशतकांच्या बळावर मुंबईने सौराष्ट्रला पाच गडी आणि १२ चेंडू राखून नेस्तनाबूत केले.

प्रथम फलंदाजी करताना अर्पित वसावडा (५९) आणि चिराग जानी (४०) यांच्या उपयुक्त योगदानामुळे सौराष्ट्रने ५० षटकांत ९ बाद २४५ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईतर्फे शार्दूल ठाकूर आणि शाम्स मुलानी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात सलामीवीर जय बिश्त (२) आणि सिद्धेश लाड (०) स्वस्तात माघारी परतल्यानंतर आदित्य तरे आणि श्रेयस यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १०१ धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. तरे (२९) बाद झाल्यानंतर श्रेयसही मागोमाग पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आठ चौकार आणि दोन षटकारांसह ७३ धावा केल्या. शिवम दुबे (९) फारशी चमक दाखवू शकला नाही.

त्यानंतर मात्र सूर्यकुमार (नाबाद ८५) आणि शुभम रांजणे (नाबाद ४५) यांनी पाचव्या गडय़ासाठी ११५ धावांची अभेद्य भागीदारी रचून मुंबईचा विजय साकारला. शुक्रवारी मुंबईचा हैदराबादशी सामना रंगणार आहे.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र : ५० षटकांत ९ बाद २४५ (अर्पित वसावडा ५९, चिराग जानी ४०; शार्दूल ठाकूर ३/३६) पराभूत वि. मुंबई : ४८ षटकांत ५ बाद २४८ (सूर्यकुमार यादव नाबाद ८५, श्रेयस अय्यर ७३; कुशांग पटेल २/३३).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN