विराटचा नवा विक्रम; ठरला पहिला भारतीय कर्णधार !

Indian News

Indian News

Author 2019-10-11 09:55:00

img

पुणे: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतले २६ वे शतक झळकावले. या कामगिरीच्या जोरावर विराट कोहली कर्णधार म्हणून ४० शतक झळकावणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी त्रिशतकी मजल मारत कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. या शतकी खेळीदरम्यान विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगला चांगलीच टक्कर दिली आहे. विराट रिकी पाँटींगचे विक्रम मोडण्यासाठी आता केवळ १ शतक दूर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

आफ्रिकेविरुद्धचे शतक हे विराटचे १९ वे शतक ठरले आहे.

शतके आणि कर्णधार
रिकी पाँटींग - ४१ शतके (३७६ डाव)
विराट कोहली - ४० शतके (१८५ डाव)*
ग्रॅम स्मिथ - ३३ शतके ३६८ डाव)
स्टिव्ह स्मिथ - २० शतके (११८ डाव)
मायकल क्लार्क - १९ शतके (१७१ डाव)
ब्रायन लारा - १९ शतके (२०४ धावा)


READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN