विराटची चिंता वाढली, भारताचं कसोटीतील सिंहासन धोक्यात!
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने दणक्यात पुनरागमन केले. आधी वेस्ट इंडिजला टी-20 आणि कसोटी मालिकेत क्लीन स्विप देत आपला दबदबा कायम ठेवला. तर, दक्षिण आफ्रिका विरोधात झालेली टी-20 मालिका बरोबरीत सुटली. आता भारतीय संघ 2 ऑक्टोबरपासून अफ्रिका विरोधात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेत विराटसेनेला एक पराभवही महागात पडू शकतो.
जगातील नंबर 1 कसोटी संघ असलेल्या भारतीय संघाचे स्थान धोक्यात आले आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यात फक्त मालिकेत विजय मिळवण्याची नाही तर कसोटी रँकिंगमध्ये पाहिले स्थान मिळवण्याची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला एक चूक महागात पडू शकते.
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीवर आरोप, 'मनमानी थांबवून निवृत्तीवर विचार करावा'
सध्या कसोटी रँकिंगमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. जर तीन सामन्यांच्या मालिकेत अफ्रिका विरोधात 0-3, 0-2, 0-1ने पराभव झाल्यास भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर पोहचेल. त्यामुळे विराटसेनेला आपले स्थान कायम राखण्यासाठी ही मालिका 3-0ने जिंकावी लागणार आहे. सध्या भारतीय संघ 115 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर 109 गुणांसह न्यूजिलँडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ 108 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान याआधी झालेल्या टी-20 मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघानं पुनरागमन करत 1-1नं मालिकेत बरोबरी केली. त्यामुळं आफ्रिकेचा संघ भारत भुमिवर चांगल्या लयीत दिसत आहे.
क्रिकेटपटूला भोवले 140 किलो वजन, आळशीपणामुळं झाला रनआऊट; पाहा हा VIRAL
टी-20मध्ये भारतीय संघाचे स्थान घसरले
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या टी-20 क्रमवारीत (ICC T20I Rankings) भारताचे स्थान घसरले आहे. ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर होता तो आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मालिका बरोबरीत सोडवण्याचा फायदा आफ्रिकेच्या संघाला मिळाला आहे. आफ्रिका मालिकेआधी चौथ्या स्थानावर होता तो आता तिसऱ्या स्थानावर गेला आहे.
मी काय तबला वाजवण्यासाठी आहे का? टीकाकारांवर रवी शास्त्री भडकले