विशाखापट्टणम : ‘हीटमॅन’ चे शतक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-02 16:21:00

img

ऑनलाइन टीम / विशाखापट्टणम : 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी सामन्यात पहिल्यांदाच सलामीला उतरलेल्या रोहित शर्मा व मयंक अग्रवालसोबत चांगली भागीदारा रोहीतने आपलं शतक पूर्ण केलं आहे.

सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी धावांची भागीदारी करत भारताचं पारडं वर ठेवलं आहे. उपहारापर्यंत सलामीवीर रोहित शर्मा 100 तर मयांक अग्रवाल 76 धावांवर खेळत होता.

रोहितनं आपल्या 152 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. रोहितचे कसोटी क्रिकेटमधले हे वे 4 थे शतक आहे. रोहितची ही सलामीचा फलंदाज म्हणून पहिले शतक आहे. भारतीय टीमच 54 ओव्हरमध्ये 179 धावा झाल्या आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN