वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला विश्रांती

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-07 05:23:00

वृत्तसंस्था/ पर्थ

शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱया तिसऱया व अंतिम टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे. ऑसी संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी याबाबतची माहिती दिली. कमिन्स हा अलीकडील काळात सातत्याने टी-20 क्रिकेट खेळत आला आहे. पुढील आठवडय़ात पाकविरुद्ध कसोटी मालिका होणार असल्याने सध्या त्याला विश्रांतीची गरज असल्याचे लँगर यांनी स्पष्ट केले. अर्थात, कमिन्सच्या जागी बदली खेळाडूची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पाकविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आम्हांला खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असणे गरजेचे आहे, यासाठी कमिन्सला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD