वेस्ट इंडिजचा अफगाणिस्तानवर विजय, मालिकेत २-० ने आघाडी

Indian News

Indian News

Author 2019-11-10 16:56:39

img

लखनऊ - दुस-या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने वेस्ट इंडिजला ५० षटकांत ९ बाद २४७ अशा धावसंख्येवर रोखलं. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरन याने ५० चेडूंत ७ चौकार व ३ षटकांरासह सर्वाधिक ६७ धावा केल्या. एविन लुइसने ५४, शाइ होपने ४३ आणि शिमरन हेटमायरने ३४ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक याने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

विजयासाठी २४८ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ ४५.४ षटकांत २०० धावांवरच आटोपला. अफगाणिस्तानकडून फलंदाजीत नजीबुल्लाह जादरान याने ५६, रहमत शाहने ३३ आणि मोहम्मद नबीने ३२ धावा केल्या. वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत शेल्डन काॅटरेल, राॅसटन चेज आणि हेल्डन वाल्श यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत विजय साकारला. निकोलस पूरन हा विजयाचा शिल्पकार ठरला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN