शाकीबवर दोन वर्षांची बंदी; आयसीसीकडून कारवाई

Indian News

Indian News

Author 2019-10-30 07:50:00

img

बुकीशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यामुळे बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकीब अल हसनचा पाय खोलात गेला आहे . शाकीब अल हसनने दोन वर्षांपूर्वी दूरध्वनीवर बुकीशी संभाषण केल्याचे आयसीसीच्या करप्शन युनिटने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. मात्र तीन वेळा बुकींनी संपर्क साधल्यानंतरही याबाबतची माहिती बांगलादेशच्या या क्रिकेटपटूने आयसीसी किंवा बांगलादेश क्रिकेट बोर्डापैकी कोणत्याही प्रतिनिधीला दिली नाही. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने शाकीब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावली आहे . यामुळे हिंदुस्थान दौऱ्यावर निघालेल्या बांगलादेशला धक्का बसला आहे . शाकीब अल हसन यामुळे आता आगामी हिंदुस्थान दौऱ्यासह आयपीएल व पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेण्टी -20 वर्ल्ड कपलाही मुकेल .

चूक मान्य केली

बुकीकडून फिक्सिंगबाबत ऑफर मिळतात प्रोटोकॉलनुसार शाकीब अल हसनने आयसीसीशी संपर्क साधायला हवा होता , पण त्याने तसे केले नाही . बंदीच्या शिक्षेनंतर शाकीब अल हसन म्हणाला , ज्या खेळावर माझे प्रेम आहे त्यापासून थोडा वेळ दूर राहणार आहे . ही बाब निराशाजनक आहे . पण मी चूक केली असून बंदीची शिक्षा मान्य आहे .

सरावापासूनही दूर

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD