शानदार यशात सांघिक भावनेचे योगदान महत्त्वाचे

Indian News

Indian News

Author 2019-10-15 07:02:29

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटी सामने जिंकून भारताने मायदेशातील मैदानावरील आपली विजय मोहीम कायम राखताना ११ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयात संघातील प्रत्येक खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. कॅरेबियन दौऱ्यात संघाची आघाडीची फळी अपयशी ठरली होती. पण आता रोहित शर्मा व मयांक अगरवाल या नव्या सलामी जोडीने शानदार कामगिरी करीत आपले स्थान पक्के केले आहे. रोहित शर्माने विशाखापट्टणममध्ये पहिल्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये सलग शतके ठोकली, तर मयांकने कारकिर्दीतील पहिल्या शतकाचे रूपांतर द्विशतकी खेळी करताना पुणेमध्ये आणखी एक शतक ठोकले.
काही काळ शांत राहिल्यानंतर कर्णधार कोहलीनेही पुण्यामध्ये द्विशतकी खेळी केली.

त्यावरून धावांसाठी तो किती भुकेला आहे, याची कल्पना येते. भारतात ज्यावेळी यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना विशाल धावसंख्या उभारली त्यावेळी दिग्गज प्रतिस्पर्धी संघालाही लढतीत आव्हान कायम राखणे कठीण ठरले आहे. दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ कमकुवत झाला आहे. त्याचसोबत भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या आहेत.कॅगिसो रबादाने टप्प्याटप्प्यात चांगली कामगिरी केली. पण त्याच्या गोलंदाजीमध्ये भेदकतेचा अभाव जाणवला.
भारताच्या यशात गोलंदाज महत्त्वाचे ठरले. ज्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना चांगली मदत मिळत नाही, त्या खेळपट्ट्यांवरही भारतीयांनी चांगली कामगिरी केली. रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन शानदार ठरले. त्याने पुन्हा एकदा श्रेष्ठत्व सिद्ध केले. रवींद्र जडेजाने धावा रोखणाऱ्या गोलंदाजापासून बळी घेणारा गोलंदाज अशी ओळख निर्माण केली. संथ खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या रिद्धिमान साहाच्या कामगिरीमुळे मला वैयक्तिक आनंद झाला. खेळाप्रती समर्पणाच्या वृत्तीचे सादरीकरण करताना त्याने आकर्षक झेल टिपले.
भारताने मालिका जिंकली असली तरी भारतीय संघ शानदार कामगिरी कायम राखण्यास प्रयत्नशील राहील, अशी मला आशा आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला कुठल्याही प्रोत्साहनाची गरज नाही, कारण ते आपले वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहेत.
- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN