शास्त्रींचे पद धोक्यात

Deshdoot

Deshdoot

Author 2019-09-30 02:42:00

img

मुंबई | बीसीसीआयने शास्त्री यांची निवड करणार्‍या सल्लागार समितीमधील सदस्यांना हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला योग्य उत्तर देता न आल्यास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद धोक्यात येऊ शकते.

सल्लागार समितीमधील कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी यांना बीसीसीआयने परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी पाठविलेल्या नोटिशीला १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहेे. बीसीसीआयची नोटीस मिळाल्यानंतर रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून ज्यांनी शास्त्री यांची निवड केली, त्यांनाच राजीनामा देण्याची वेळ आल्याची चर्चा सुरू आहे. राजीनाम्यानंतर रंगास्वामी यांनी म्हटले, माझ्याकडे सध्या इतरही बरीच कामे असल्यामुळे मी राजीनामा देत आहे. तसेही क्रिकेट सल्लागार समितीची बैठक वर्षातून २ ते ३ वेळा होते. यामुळे परस्पर हितसंबंध जपण्याचा मुद्दाच येत नाही. मात्र असे होत राहिले तर एकही क्रिकेटपटू सल्लागार समितीमध्ये काम करू शकणार नाही.

विश्‍वचषकानंतर बीसीसीआय प्रशिक्षकांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड केली होती.

कपिल देव सध्या बीसीसीआयशी समालोचक म्हणून करारबद्ध आहेत. विश्‍वचषकानंतर बीसीसीआय प्रशिक्षकांच्या निवड प्रक्रियेत समितीच्या अध्यक्षस्थानी असताना त्यांनी शास्त्री यांची फेरनिवड केली होती. या समितीमध्ये कपिल देव यांच्यासह माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी होते. बीसीसीआयमध्ये कोणतीही व्यक्ती फक्त एकच पद भूषवू शकते. त्यापेक्षा जास्त पद भूषवले की परस्पर हितसंबंध जपल्याचे म्हटले जाते. असाच आरोप मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला आहे. त्यानुसार बीसीसीआयने या तिघांनाही नोटीस पाठवली आहे. या तिघांनाही बीसीसीआयला उत्तर देणे बंधनकारक असणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD