शेफिल्ड क्रिकेट स्पर्धेत स्मिथ, वॉर्नरचे पुनरागमन

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-08 04:30:00

img

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियात खेळविल्या जाणाऱया शेफिल्ड ढाल क्रिकेट स्पर्धेत माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन होणार आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर स्मिथ आणि वॉर्नर यांचे या स्पर्धेत पुनरागमन होत आहे. येत्या गुरूवारी शेफिल्ड स्पर्धेतील न्यू साऊथ वेल्स आणि क्विन्सलँड यांच्यातील सामना सुरू होणार असून स्मिथ आणि वॉर्नर न्यू साऊथ वेल्स संघाचे प्रतिनिधीत्व करतील. यापूर्वी म्हणजे 2017 नोव्हेंबरमध्ये शेफिल्ड स्पर्धेतील चार दिवसांच्या सामन्यात स्मिथ आणि वॉर्नर यांनी आपला सहभाग दर्शविला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात वॉर्नर आणि स्मिथ दोषी ठरल्याने त्यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची बंदी घातली होती.

2019-20 शेफिल्ड स्पर्धेच्या हंगामात न्यू साऊथ वेल्सचा पहिल्या फेरीतील सामना गुरूवारी होणार असून या सामन्यासाठी संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. स्मिथ, वॉर्नर तसेच स्टार्क यांचा या सामन्यात समावेश राहील.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN