श्रीलंकेला सापडला दुसरा लसिथ मलिंगा, पहा व्हिडिओ

Indian News

Indian News

Author 2019-09-28 19:40:37

img

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने मागील अनेक वर्षांपासून दमदार कामगिरी करत विविध विश्वविक्रमही रचले आहे. तो श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्येही गणला जातो. त्याचे यॉर्कर चेंडू खेळताना जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना संघर्ष करायला लागला आहे.

पण मलिंगाने कसोटी आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर तो 2020 टी20 विश्वचषकानंतर टी20मधूनही निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

पण असे असले तरी श्रीलंकेत काहीशी त्याच्या सारखीच गोलंदाजी शैली असणारा एक गोलंदाज तयार होत आहे. त्याचे नाव मथिशा पथिराना असे असून तो 17 वर्षांचा आहे. सध्या त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की त्याच्या शानदार गोलंदाजीपुढे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरला. तसेच पथिरानाची मलिंगाप्रमाणे असणारी गोलंदाजी शैलीही पहायला मिळते.

विशेष म्हणजे पथिरानाने ट्रिनिटी महाविद्यालयाकडून पदार्पण करताना प्रतिस्पर्धी संघाचे सहा फलंदाज केवळ 7 धावा देत बाद केले.

तसेच पथिरानाची श्रीलंकेच्या 19 वर्षांखालील प्रोविंन्शिअल टूर्नामेंट या देशांतर्गत स्पर्धेसाठी कॅन्डी संघातही निवड झाली होती.

Related Posts

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर लान्स क्लूजनर झाला या मोठ्या.

Sep 28, 2019

टी२०मध्ये यष्टीरक्षणात धोनीलाही मागे टाकणाऱ्या या महिला.

Sep 28, 2019

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN