षटकार मारून रोहितचा डबल धमाका, कसोटीत झळकावलं द्विशतक

Indian News

Indian News

Author 2019-10-20 14:54:00

img

रांची, 20 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताचा सलामीवर रोहित शर्माने द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक साजरं केलं. पहिल्या दिवसाच्या 3 बाद 224 धावांवरून डावाची सुरुवात करताना अजिंक्य रहाणेनं शतक साजरं केलं. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 11 वं शतक आहे. दरम्यान, दुसरीकडे रोहित शर्मा कसोटीत पहिलं द्विशतक करताना नाट्यमय घडामोडी घडल्या. त्याला द्विशतकासाठी एक धाव हवी असताना उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला. तेव्हा भारताच्या 4 बाद 357 धावा झाल्या होत्या. रोहित शर्मा 199 धावांवर तर जडेजा 15 धावांवर नाबाद होता. रोहितने शतकाप्रमाणेच द्विशतकसुद्धा षटकार मारून साजरं केलं.

पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 224 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रहाणेनं शतक तर रोहित शर्मानं द्विशतक साजरं केलं. हे त्याचं कसोटी क्रिकेटमधील पहिलंच द्विशतक आहे. रहाणे 115 धावांवर बाद झाला. त्याला डेन पीटनं बाद केलं. त्यानंतर रोहित शर्माने द्विशतक साजरं केलं.

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विराटने घेतला पण चहापानापुर्वीच तीन फलंदाज माघारी परतले. सलामीवीर मयंक अग्रवाल फक्त 10 धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार विराट कोहलीला एनरिच नॉर्तजेनं बाद केलं. प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या भारताची अवस्था एकवेळ 15.3 षटकांत 3 बाद 39 अशी झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी शतकी भागिदारी करून डाव सावरला.

भारतीय संघाने याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एक डाव 137 धावांनी मोठा विजय भारतानं साजरा केला. आता रांचीतील कसोटी जिंकून क्लीन स्वीपच्या इराद्याने भारतीय संघ खेळेल.

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD