सचिन, द्रविड आणि सेहवागचा विक्रम मोडण्याची विराटला संधी

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-02 03:01:00

img

विशाखापट्टणम । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हा विक्रम विराट मोडणार असल्याची दाट शक्यता आहे. या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर विराटचा समावेश सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या ‘क्लब’मध्ये होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामन्यात एक हजारपेक्षा अधिक धावा करणार्‍या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या तिघांचा समावेश आहे. विराटला या यादीत येण्यासाठी अवघ्या 242 धावांची आवश्यकता आहे. सध्याचा विराटचा फॉर्म पाहता विराट या मालिकेतच हा विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून 16 डावांत फलंदाजी करत 47.37 च्या सरासरीने 758 धावा केल्या आहेत. त्याशिवाय दोन शतकं आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. आता आगामी कसोटी मालिकेत 242 धावा केल्यानंतर विराटच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक हजार कसोटी धावा पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा विराट चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय खेळाडूंमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या अव्वल स्थानी आहे. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 45 डावात फलंदाजी कतरत 1741 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, वीरेंद्र सेहवागने 15 कसोटी सामने खेळले आहेत. सेहवागने 5 शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 1306 धावा झळकावल्या. तर राहुल द्रविडने 21 कसोटी सामन्यात 2 शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने 1252 धावा केल्या आहेत. या तिघांशिवाय, व्हीव्हीएस लक्ष्मण (976 धावा), सौरभ गांगुली (947 धावा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (779 धावा) यांचा सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. विराट पहिल्याच कसोटीत अझरुद्दीनचा विक्रम मोडेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN