सय्यद मुश्ताक अली टी-२० : मुंबईच्या संघाची घोषणा

Loksatta

Loksatta

Author 2019-11-04 19:26:58

img

८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार असून पाच गटांमध्ये ही स्पर्धा पार पडेल. अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघाला अंतिम फेरी गाठता आलेली नव्हती, त्यामुळे या स्पर्धेत मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कर्नाटकचा संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे.

मुंबईचा संघ पुढीलप्रमाणे –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), जय बिस्ता, आदित्य तरे, सर्फराज खान, जयदीप परदेशी, सिद्धेश लाड, शुभम रांजणे, शम्स मुलानी, परिक्षीत वालसंगकर, रौनक शर्मा, धवल कुलकर्णी, कृतिक हंगेवाडी, दिपक शेट्टी, आकीब कुरेशी, ध्रुमिल मटकर

अवश्य वाचा –  D. B. Deodhar Trophy : भारत ब संघाला विजेतेपद

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD