सानिया मिर्झाची बहिण होणार अझरूद्दीनची सून!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : क्रीडा क्षेत्र आणि बॉलिवूड हे नातं खूप जुनं आहे. पण आता क्रिकेट आणि टेनीस असंही नातं बहरणार आहे. कारण टेनिसपटू सानिया मिर्झा आणि भारताचा माजी कर्णधार महंम्मद अझरूद्दीन आता विहिण-व्याही होणार आहेत. सानियाची बहिण अनम मिर्झा आता अझरूद्दीनची सून होणार आहे.
महंम्मद अझरूद्दीनचा मुलगा महंमद असदुद्दीन याचा निकाह सानियाची बहिण अनम मिर्झाशी होणार आहे. गेले काही दिवस त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे व त्यांचा निकाह या डिसेंबरमध्ये होणार असून या चर्चेवर सानियाने शिक्कामोर्तब केले आहे. सानिया, तिची बहिणी अनम व तिच्या मैत्रिणी नुकत्याच पॅरिसवरून अनमची बॅचलर्स पार्टी करून परतल्या आहेत.