सारा टेलरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Indian News

Indian News

Author 2019-09-28 15:00:43

img

नवी दिल्ली । महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टिरक्षक सारा टेलर हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सारा टेलर हिने वयाच्या 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. साराने इंग्लंडच्या महिला क्रिकेटमध्ये 13 वर्षे इतका वेळ घालवला आहे. सारा गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रासाला सामोरी जात आहे. तिच्या या त्रासामुळे तिने अनेकदा क्रिकेटपासून लांब राहावे लागलं आहे. मात्र यानंतर तिने साराने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. साराला महिला क्रिकेट विश्वातील धोनी म्हणून ओळखले जाते.

आतापर्यंत तिने 226 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तिने एकूण 6,333 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक धावा करणारी ती इंग्लंडची दुसरी क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर तिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये यष्टिमागे एकूण 232 बळी मिळविले आहेत.





READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN