सिद्धी सपतालचे थ्रो बॉल स्पर्धेत दैदिप्यमान यश

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-03-08 17:44:47

img

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय 'अंडर 17 टीन' थ्रो बॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत नांदेडच्या सिद्धी  सपताल या तरुणीने मोठं यश संपादन केलं आहे.  

या स्पर्धेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे तर कर्नाटकने दुसरा आणि उत्तराखंड- उत्तर प्रदेशने तिसरा क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांनी मिळविलेल्या यशाबाबत सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.   

पंजाब मधील लुधियाना येथे दोन दिवसीय (ता.18-19) थ्रो बॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओडीसा, उत्तरप्रदेश-उत्तराखंड, नॉर्थ इंडीया, वेस्ट इंडीया, तामिळनाडू, कर्नाटक, महारष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यांच्या टिमने सहभाग घेतला होता.  युरोपियन देशात थ्रो बॉल खेळ अतिशय लोकप्रिय आहे. भारतीय तरुणाईत थ्रो बॉल गेमची क्रेझ निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्याने नेत्रदीप यश संपादन केले आहे.

महाराष्ट्रची थ्रो बॉल टीम
थ्रो बॉल टीमचे कर्णधार धुन त्रिवेदी, उपकर्णधार वर्मा, सिद्धी सपकाळ, भूमी कोरडे, लावण्य तांबे, काव्या कुठियाला, राधिका बोहरा, रुतु शाह, उदिती शाह, निशा कुलचंदानी, अदिती शर्मा, मुस्कान डांगी या खेळाडूचा समावेश होता. कॅसॅन्ड्रा डिसोझा यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

थ्रो बॉल गेम
या खेळात नऊ खेळाडूंची एक टीम असते. कोटवर हा गेम खेळला जातो. एक टीम दुसऱ्या टीमकडे बॉल फेकत असते. तो बॉल झेलणारी टीम विजयी होते.

थ्रो बॉल 9- साइड स्पोर्ट आहे. या खेळात मेंदूचा आणि शरीराचा एकत्रित उपयोग आहे. गेममध्ये सहभागी होण्यासाठी दृढ निश्चय, खेळाची भावना, तंदुरुस्त शरीर आणि अंतिम कॉल होईपर्यंत कधीही हार न मानण्याची सवय असणे आवश्यक आहे. हा भारतातील सर्वात ट्रेन्डिंग खेळ आहे. हा सर्व स्तरावर खेळला जाणार खेळ आहे.
- कॅसेंड्रा रेगिनल्ड डीसोझा, प्रशिक्षक, महाराष्ट्र राष्ट्रीय थ्रोबॉल टीम.

ही सुरुवात आहे, मला अजून खूप चांगलं खेळायचं आहे. माझ्या खेळाला मी छंद म्हणून जोपासते. माझे आई-वडील आणि कोच यांनी माझ्या खेळाला अजून चांगले होण्यासाठी बळ दिले आहे.
- सिद्धी सपताल, विजेती खेळाडू

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD