सिमन्स पुन्हा विंडीजचे प्रशिक्षक

Loksatta

Loksatta

Author 2019-10-16 04:08:23

img

सेंट जॉन्स : तीन वर्षांपूर्वी वादग्रस्त पद्धतीने हकालपट्टी करण्यात आलेल्या फिल सिमन्स यांच्याकडे वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे देण्यात आली आहे. सिमन्स पुढील चार वर्षे वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विंडीजने २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते; परंतु मानधनाची समस्या तीव्र झाल्यावर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

‘‘सिमन्स यांच्याकडे प्रशिक्षपद देण्यात आले म्हणजे भूतकाळ चुकीचा ठरवून वर्तमान बरोबर ठरवत नाही; परंतु योग्य वेळी योग्य व्यक्तीकडे जबाबदारी देणे महत्त्वाचे वाटते,’’ असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी सांगितले.

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील यश सिमन्स कसोटी क्रिकेटमध्ये परिवर्तित करू शकले नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ कसोटी सामन्यांपैकी वेस्ट इंडिजने एकमेव सामनाजिंकला होता. सिमन्स आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ यांच्यातील मतभेद २०१५ मध्ये चव्हाटय़ावर आले होते. कारण श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत त्यांनी तक्रार केली होती. नंतर निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यामुळेच त्यांना पद गमवावे लागले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD