सुरेश रैनाचा चौथ्या क्रमांकावर दावा

Deshdoot

Deshdoot

Author 2019-09-28 02:59:00

img

मुंबई | गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या सुटली नाही. अशात आता सुरेश रैनानेही चौथ्या क्रमांकासाठी त्याचा दावा सांगितला आहे. भारताकडून ३२२ सामने खेळणारा रैना हा मागच्या वर्षभरापासून संघातून बाहेर आहे. सुरेश रैनाने भारताकडून शेवटचा सामना जुलै २०१८ मध्ये खेळला होता.

पुढच्या २ वर्षांमध्ये होणार्‍या २ टी-२० विश्‍वचषकात पुनरागमन करण्यासाठी सुरेश रैना प्रयत्न करत आहे. रैना म्हणाला, मी भारतीय संघाच्या चौथ्या क्रमांकावर असू शकतो. याआधीही मी या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि चांगली कामगिरीही केली होती. पुढच्या २ वर्षांत २ टी-२० विश्‍वचषक होणार आहेत, त्यामुळे मी संधीची वाट बघत आहे. सुरेश रैनाने भारतासाठी २२६ एकदिवसीय, ७८ टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळले आहेत. ३ वर्षांपासून भारताची चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची अडचण आहे. मागच्या वर्षी अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक संधी दिली. मात्र विश्‍वचषक संघात त्याला संधी मिळाली नाही.

विश्‍वचषक संघाच्या चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड झाली, पण सुरुवातीला केएल राहुल या क्रमांकावर खेळला. शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर राहुलने सलामी केली. यानंतर विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळायला मिळाले. विजय शंकरलाही दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर पंतच खेळत आहे, पण त्याला सतत अपयश येत आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN