सौरव गांगुली बनणार बीसीसीआयचा नवा ‘बॉस’…

Maha Sports

Maha Sports

Author 2019-10-14 10:43:00

img

भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनण्याची दाट शक्यता आहे. या पदासाठी ब्रिजेश पटेल यांचे नाव आघाडीवर होते. मात्र काही नाट्यमय घडामोडींनंतर गांगुलीचे नाव पुढे आले आहे.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाहला सचिवपद मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांचा लहान भाऊ अरुण धूमलकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. तो जर बीसीसीआयचा अध्यक्ष झाला तर त्याचा कार्यकाल पुढील 10 महिन्यासाठी असेल. तो मागील 5 वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये पदाधिकारी होता.

तसेच बीसीसीयच्या नियमानुसार कोणत्याही पदापवर 6 वर्षे झाल्यानंतर त्या व्यक्तीला कूलिंग ऑफ पिरियड(विश्रांती) अनिवार्य आहे. त्यामुळे गांगुलीला पुढील 10 महिनेच या पदावर राहता येणार आहे.

रविवारी मुंबईमध्ये बीसीसीआयच्या सर्व सदस्यांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत अनुराग ठाकुर आणि एन श्रीनिवास यांचे दोन गट पडले होते. यामध्ये ब्रीजेश पटेल यांचे नाव श्रीनिवास गटातून आघाडीवर होते. पण अखेर गांगुलीच्या नावावर सर्वांनी सहमती दिली. ब्रिजेश पटेल आता आयपीएलचे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN