स्टीव्ह स्मिथ अव्वल! विराट दुसऱया स्थानी

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-15 06:15:00

img

आयसीसी कसोटी क्रमवारी : स्मिथ व विराटमध्ये केवळ एका गुणाचा फरक

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने अग्रस्थान कायम राखले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱया स्थानी असून न्यूझीलंडचा केन विल्यम्सन तिसऱया स्थानी आहे. विशेष म्हणजे, द.आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी साकारलेल्या विराटच्या गुणात वाढ झाली असून अव्वलस्थानी असणाऱया स्मिथपेक्षा तो एका गुणानी पिछाडीवर आहे. 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्मिथ ताज्या क्रमवारीत 937 गुणासह पहिल्या स्थानावर असून भारतीय कर्णधार विराट 936 गुणासह दुसऱया स्थानी विराजमान आहे. किवीज कर्णधार केन विल्यम्सन 878 गुणासह तिसऱया स्थानी कायम आहे. भारतीय खेळाडूंत चेतेश्वर पुजाराने देखील चौथे स्थान कायम राखले असून रोहित शर्माची मात्र 22 व्या स्थानावर घसरण झाली आहे. रहाणेने मात्र नववे स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडचा निकोल्स पाचव्या, इंग्लंडचा रुट सहाव्या, टॉम लॅथम सातव्या, लंकेचा करुणारत्ने आठव्या स्थानी आहे.

गोलंदाजीत पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर

गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने 908 गुणासह आपले पहिले स्थान कायम राखले आहे. कॅगिसो रबाडा दुसऱया तर भारताचा जसप्रीत बुमराह तिसऱया स्थानी आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये आर.अश्विनने टॉप-10 मध्ये स्थान मिळवले असून सातवे स्थान पटकावले आहे. अन्य भारतीयांत जडेजा 14 व्या, शमी 16 व्या, इशांत शर्मा 21 व्या तर उमेश यादव 25 व्या स्थानी आहे.

सांघिक क्रमवारीमध्ये भारताचा दबदबा

आयसीसीच्या सांघिक क्रमवारीत टीम इंडिया 115 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघ 109 गुणासह दुसऱया, दक्षिण आफ्रिका 108 गुणासह तिसऱया, इंग्लंड 104 गुणासह चौथ्या, ऑस्ट्रेलिया 99 गुणासह पाचव्या, श्रीलंका 95 गुणासह सहाव्या, पाकिस्तान 84 गुणासह सातव्या, विंडीज 80 गुणासह आठव्या, बांगलादेश 61 गुणासह नवव्या स्थानी आहे.

आयसीसी फलंदाजी क्रमवारी –

गोलंदाजी क्रमवारी –

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD