स्टोक्स पती-पत्नीने झगडय़ाचे वृत्त फेटाळले

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-10 05:28:00

img

लंडन / वृत्तसंस्था

व्यावसायिक क्रिकेटपटू संघटनेच्या पुरस्कार वितरण सोहळय़ात कोणत्याही प्रकारचा झगडा, धक्काबुक्की वा शाब्दिक बाचाबाची झाल्याचे वृत्त इंग्लिश क्रिकेटपटू बेन स्टोक्स व त्याची पत्नी क्लॅरे यांनी फेटाळून लावले. उत्तर लंडनमधील कॅमडेन येथील राऊंडहाऊसमध्ये आयोजित सदर सोहळय़ात बेन स्टोक्सने क्लॅरेवर हात उगारल्याचे आणि त्यावर क्लॅरेनेही त्याला प्रत्युत्तर दिल्याची काही छायाचित्रे चांगलीच व्हायरल झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, स्टोक्स पती-पत्नीने यात काहीही तथ्य नसल्याचा व फोटोशी छेडछाड करुन प्रस्तूत केले गेले असल्याचा दावा केला आहे.

इंग्लंडने यंदा जुलै महिन्यात प्रथमच आयसीसी वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी अष्टपैलू स्टोक्स अंतिम फेरीतील सामनावीर ठरला. शिवाय, अनिर्णीत ऍशेस मालिकेत हेडिंग्ले कसोटी सामन्यात लक्षवेधी, नाबाद शतकही झळकावले. याबद्दल या 28 वर्षीय डरहॅमच्या खेळाडूचा सन्मान केला गेला. त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार बहाल केला गेला.

व्यावसायिक क्रिकेटपटूंची संघटना व इंग्लंड, वेल्स क्रिकेट मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या बक्षीस वितरण सोहळय़ाचे आयोजन केले गेले होते. पण, हा सोहळा संपन्न झाल्यानंतर काही कालावधीतच स्टोक्स पती-पत्नीत बरीच बाचाबाची झडल्याचे दर्शवणारी काही छायाचित्रे सोशल नेटवर्कवरुन व्हायरल झाली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

क्लॅरेने बेन स्टोक्सची पाठराखण करताना आपल्या ट्वीटर पोस्टवर आपण बेनला गोंजारत असल्याचा दावा केला. ‘आम्ही दोघेही एकमेकांप्रती असलेला आदर व्यक्त करत होतो. पण, दुर्दैवाने पापाराझींनी त्याला वेगळे वळण देण्याचा चुकीचा प्रयत्न केला आहे. त्या सोहळय़ानंतर आम्ही मॅकडोनाल्डसमध्ये 20 मिनिटे व्यतित केली’, असे क्लॅरेने ट्वीट केले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD