स्मृतीची अग्रस्थानावरून घसरण

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-16 05:11:00

img

महिला वनडे क्रमवारीत न्यूझीलंडची ऍमी सॅटर्थवेट अग्रस्थानी

वृत्तसंस्था/ दुबई

भारतीय महिला संघातील सध्या जखमी असलेली सलामीवीर स्मृती मानधनाचे महिलांच्या वनडे क्रमवारीतील अग्रस्थान निसटले असून न्यूझीलंडच्या ऍमी सॅटर्थवेटने तिचे अग्रस्थान मिळविले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे मानांकनात स्मृतीच्या खात्यावर 755 गुण असून ती आता दुसऱया स्थानावर घसरली आहे. दुखापतीमुळे तिला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी होता आले नव्हते. तिच्या उजव्या पायाच्या अंगठय़ाला दुखापत झाली असून द.आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याआधी सराव करताना तिला चेंडू लागून ही दुखापत झाली होती. अन्य फलंदाजांत वनडे कर्णधार मिताली राजचीही एका स्थानाने घसरण झाली असून ती सातव्या स्थानावर आहे तर हरमनप्रीत कौरने एका स्थानाची प्रगती करीत 17 वे स्थान घेतले आहे.

गोलंदाजांत झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूनम यादव यांचीही घसरण झाली असून ते अनुक्रमे सहा, आठ व नवव्या स्थानावर आहेत. अष्टपैलूंमध्ये दीप्ती शर्मा तिसऱया स्थानावर घसरली आहे आणि शिखा पांडे पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये दाखल झाली आहे. तिने आता दहावे स्थान मिळविले आहे. 

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN