हरभजन सिंग या भारतीय गोलंदाजाला म्हणाला ‘देव आनंद’…

Maha Sports

Maha Sports

Author 2019-11-07 11:02:06

img

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकला आहे. या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो लंडनला (London) गेला होता.

या दुखापतीतून सावरत असलेल्या बुमराहने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये ‘प्लेईंग इट कूल’ असे लिहिेले आहे.

बुमराहच्या या पोस्टवर भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh), हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि अक्षर पटेलने (Axar Patel) प्रतिक्रिया दिली आहे. युवराज सिंग आणि अक्षर पटेल यांनी बुमराहच्या सूट घातलेल्या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच, हरभजन सिंगने प्रतिक्रिया देताना बुमराहची तुलना बाॅलिवुड अभिनेता देव आनंदसोबत (Dev Anand) केली आहे. हरभजनची प्रतिक्रिया पाहून बुमराहनेही उत्तरादाखल हसणारे ईमोजी कमेंट केले आहे.

बुमराह पाठिच्या दुखातीतून पूर्णपणे बरा होऊन पुढीलवर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD