हरमनप्रीत, स्मृती बिग बॅश लीगला मुकणार

Loksatta

Loksatta

Author 2019-09-28 04:24:55

img

नवी दिल्ली : भारतीय ट्वेन्टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स यांना ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये सहभागी होता येणार नाही. याच कालावधीत भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.

महिलांच्या बिग बॅश लीगला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून ८ डिसेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे. मात्र भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आटोपल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी विंडीज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

‘‘परदेशातील लीगमध्ये खेळण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही भारतीय महिला खेळाडूचे मनोधैर्य खच्ची करण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) इच्छा नाही. पण आंतरराष्ट्रीय दौऱ्यांना खेळाडूंची पहिली पसंती असायला हवी,’’ असे ‘बीसीसीआय’चे महाव्यवस्थापक (क्रिकेट संचालक) साबा करीम यांनी सांगितले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN