हवामान बदलाचा कसोटी क्रिकेटवर गंभीर परिणाम!

Loksatta

Loksatta

Author 2019-10-01 06:31:31

img

मेलबर्न : ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि हवामान  बदलामुळे कसोटी क्रिकेटला धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इआन चॅपेल यांनी व्यक्त केली आहे.

‘‘पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास भविष्यात काही गंभीर समस्यांचा त्यावर परिणाम होऊ शकेल. यापैकी एक म्हणजे ट्वेन्टी-२० क्रिकेट आणि दुसरे म्हणजे हवामान बदल हा आहे,’’ असे चॅपेल यांनी म्हटले आहे.

कसोटी क्रिकेटच्या भवितव्याविषयी भाष्य करताना चॅपेल म्हणाले की, ‘‘हवामान बदलावरील उपाय काही त्रासदायक राजकीय नेत्यांकडे आहे. तापमानातील मोठी वाढ ही खेळाडूंच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करते. पावसामुळे सामन्याला विलंब झाल्यानेही खेळाडू निराश होतात. सूर्याची तेजस्वी किरणे सहन न झाल्यामुळे खेळाडूंना मैदानाबाहेर जावे लागू शकते.’’

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN